राहुल गांधी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी, करणी सेनेच्या कार्यकर्त्याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर खळबळ उडाली. करणी सनेच्या एका कार्यकर्त्याने ही धमकी दिली होती. तपासानंतर पोलिसांनी राज आमेरा या कार्यकर्त्याला अटक केली आहे.

काँग्रेसचे प्रवत्ते पवन खेरा यांनी राज आमेरा याचा धमकी देतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्या व्हिडीओमध्ये राज आमेरा धमकी देताना म्हणतो, की ओम बिर्ला यांच्याविरोधात विरोधी पक्षांच्या 25 खासदारांनी उद्धटपणा केला आहे, ते सहन केले जाणार नाही. यामागे राहुल गांधी जबाबदार असून पुन्हा असे घडल्यास या 25 खासदारांच्या घरात तोडपह्ड करू आणि राहुल गांधी यांना त्यांच्या घरात घुसून गोळ्या घालू.