जय भवानी…जय शिवाजी; माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे फुलबाजारमध्ये शिवजयंती उत्साहात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दादर येथील माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे फुलबाजार व्यापारी मंडळाच्या वतीने फुलबाजारामध्ये शिवजयंती मोठय़ा उत्साहाने साजरी करण्यात आली. फुलबाजारातील 30 शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर जाऊन शिवज्योत प्रज्वलित करून गुरुवारी पहाटे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळावर दाखल झाले. शिवसेनाप्रमुखांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन सकाळी 8 वाजता वाजतगाजत शिवज्योत फुलबाजारात आणली.

डॉ. संतोष परब दिग्दर्शित भव्य कार्यक्रमात महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा गीत- नृत्य आणि सांस्पृतिक वैभवाबरोबरच शिवचरित्रावर आधारित प्रभावी कथानक सादर करण्यात आले. या कार्यक्रमाला शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, विभागप्रमुख-आमदार महेश सावंत, आमदार सुनील शिंदे, नगरसेविका श्रद्धा जाधव, शाखाप्रमुख प्रवीण नरे, उपविभागप्रमुख सिद्धार्थ चव्हाण, माहीम विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, शाखाप्रमुख चंद्रकात झगडे यांच्याबरोबर पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य हरिभाऊ लोळे, पंचायत समिती सदस्य सायली शिंदे उपस्थित होते.

शिवजयंती उत्सव समिती अध्यक्ष संदीप दातखिळे, उपाध्यक्ष दीपक गाढवे, लक्ष्मण पुंवर, तुवार दुराफे, गिरीश चासकर, चंद्रकांत राऊत देखील होते. यावेळी मंडळाच्या वतीने अविराज पवार, प्रकाश बुचके, मच्छिंद्र शेलार, अजय काwसाले, बापूसो लोळे, प्रमुख सल्लागार मनोज पुंडे, रामदास लोखंडे, गणेश शेरकर, हरिदास मांजर्डकर, दादाभाऊ येणारे, रामदास भोसले, अजय खाडे, चंद्रकांत हुलवळे, तुषार भोसले, राजेंद्र बोचरे, राजेंद्र पवार, प्रवीण पुंडे, नीलेश शिंदे, सत्यवान पुंडे, अमोल माली, नीलेश फुलसुंदर, राहुल खांडगे, योगेश बागल, स्वप्नील खांडगे व सर्व व्यापारी उपस्थित होते.