
खाडीकिनारी बेकायदा रेती उपसा करणाऱ्या तस्करांवर कल्याणच्या महसूल विभागाने कारवाईचा बडगा उगारला. या तस्करांच्या बोटीतून अधिकाऱ्यांनी 48 ब्रास रेती जप्त केली आहे. याप्रकरणी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात तस्करांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी तसेच स्थानिक पोलिसांनी दुर्गाडी किल्ला रेतीबंदर परिसरात अचानक धाड मारली. कारवाईची चाहूल लागताच रेतीमाफियांनी खाडीत उड्या मारत पळ काढला. पथकाने जप्त केलेली 48 ब्रास रेती पुन्हा ढकलून दिली. तसेच बोटीसह बार्ज, सक्शन पंप असे नऊ लाखांचे साहित्य नष्ट केले आहे.






























































