
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर केलेल्या टिप्पणीवरून भाजप नेते विजय मिश्रा यांनी काँग्रेस नेते, लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी राहुल गांधी यांनी शुक्रवारी सुलतानपूर येथील एमपी-एमएलए न्यायालयात आपला जबाब नोंदवला. मागील सुनावणीला अनुपस्थित राहिल्यामुळे न्यायालयाने त्यांना आज हजर राहण्याचे आदेश दिले होते.
राहुल गांधीच्या या प्रकरणावर काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. आसाम दौऱ्यावर असलेल्या प्रियांका गांधी म्हणाल्या की, “राहुल गांधींविरोधात खोटा खटला दाखल करून त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. आम्ही अनेक वर्षांपासून हे सहन करत आहोत. जे सत्याच्या बाजूने उभे राहतात, सरकार त्यांना ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून लक्ष्य करत आहे.” राहुल गांधींना न्यायालयीन प्रक्रियेत अडकवून त्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न असल्याचेही यावेळी त्या म्हणाल्या.
#WATCH सुल्तानपुर, उत्तर प्रदेश: लोकसभा में नेता प्रतिपक्ष और कांग्रेस सांसद राहुल गांधी MP-MLA कोर्ट से निकले।
वे केंद्रीय गृह मंत्री अमित शाह के बारे में कथित तौर पर आपत्तिजनक टिप्पणी करने के लिए उनके खिलाफ दायर 2018 के मानहानि मामले के सिलसिले में अदालत में पेश हुए थे। pic.twitter.com/cZflnnHYz6
— ANI_HindiNews (@AHindinews) February 20, 2026
काय आहे संपूर्ण प्रकरण-
हे प्रकरण 2018 मधील आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधींनी भाजपच्या नेतृत्वावर टीका केली होती. त्यांनी अमित शाह यांचा उल्लेख करत वादग्रस्त विधान केल्याचा आरोप विजय मिश्रा यांनी केला होता. या तक्रारीनुसार, राहुल गांधींनी भाजपच्या स्वच्छ राजकारणाच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याच प्रकरणाच्या चौकशीसाठी राहुल गांधींना न्यायालयात हजर व्हावे लागले असून काँग्रेसने याला राजकीय सूडाची कारवाई म्हटले आहे.

























































