असं झालं तर… तुमच्या रिल्सचा ‘‘रिच’ वाढवण्यासाठी…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इन्स्टाग्रामवर रील बनवणे जितके सोपे, पण रिल व्हायरल करणे कठीण झालंय. कधीकधी व्हिडीओवर अगदी थोडे ह्यूज येतात. अशा वेळी क्रिएटर्सनी स्मार्ट ट्रिक्स वापराव्या.

 तुमच्या व्हिडीओची सुरुवात इतकी दमदार हवी की लोकांनी स्क्रोल करणं थांबवलं पाहिजे. व्हिडीओच्या पहिल्या 3 ते 5 सेपंदात असा काही ‘हुक’ किंवा सस्पेन्स ठेवा.

ट्रेंडिंग गाणं, हॅशटॅग आणि चॅलेंजेस जरूर वापरा, पण त्यामध्ये तुमचा स्वतःची क्रिएटिव्हिटी दाखवा. लोकांचे  कॉपी केलेले व्हिडीओ अनेकदा गर्दीत हरवून जातात.

नवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न करा. योग्य वेळी पोस्टिंगची करा. कितीही चांगला व्हिडीओ बनवला आणि तो चुकीच्या वेळी पोस्ट केला तर त्याला ह्यूज मिळणार नाहीत.

व्हिडीओच्या जोडीला प्रभावी कॅप्शन आणि योग्य हॅशटॅग असणं गरजेचं आहे. कॅप्शनमध्ये असा काही प्रश्न विचारा ज्यामुळे लोक कमेंट करायला प्रवृत्त होतील.