
हिंदुस्थानी शेअर बाजारात झालेल्या घसरणीला अखेर ब्रेक लागला आहे. या आठवडय़ाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शेअर बाजार सावरला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 316 अंकांनी वाढून 82,814 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 105 अंकांनी वधारून 25,559 अंकांवर स्थिरावला. आज एनटीपीसीच्या शेअर्समध्ये 3 टक्के वाढ झाली. लार्सन अँड टुब्रोचे शेअर्स 2.3 टक्क्यांनी वाढले. आज ज्या पंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. त्यामध्ये हिंडाल्को, एनटीपीसी, एलटी, एसबीआय लाइफ, हिंदुस्थान युनिलिव्हर, कोल इंडिया, पावरग्रीड, टाटा स्टील, नेस्ले इंडिया, ओएनजीसी यासारख्या शेअर्सचा समावेश आहे. तर इंटरनल, टाटा कंज्युमर, विप्रो, महिंद्रा अँड महिंद्रा, इन्पहसिसच्या शेअर्समध्ये घसरण झाली.
3 मार्चला शेअर मार्केट बंद
3 मार्चला धुलीवंदन आहे. त्यामुळे या दिवशी शेअर मार्केट बंद राहणार आहे. या दिवशी कोणतीही ट्रेडिंग होणार नाही. बीएसई आणि एनएसईच्या अधिकृत वेबसाईटनुसार, धुलीवंदन 3 मार्चला आहे. त्यामुळे सुट्टी असणार आहे. 26 मार्चला श्री राम नवमी, 31 मार्चला श्री महावीर जयंती असल्याने या दिवशीही शेअर बाजार बंद राहणार आहे.
आयजीआयचे संपादन
इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिटय़ूटने अमेरिकन जेमोलॉजिकल लॅबोरेटरीजचे संपादन केल्याची घोषणा केली. या व्यवहारामुळे जागतिक हिरा व ज्वेलरी उद्योगात सर्टिफिकेशनच्या क्षेत्रात अधिक भक्कम स्थान मिळणार आहे.
बीएसई झी बिझनेस
बीएसईचा आर्थिक व शारीरिक आरोग्याला चालना देणारा प्रमुख उपक्रम बीएसई झी बिझनेस बुल रन 2026 चे 6 वे एडिशन रविवारी मुंबईतील बीकेसी येथील आर 2, एमएमआरडीए ग्राऊंड येथे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व्हियर फाऊंडेशनकडून ‘गॅटिन’ची स्थापना
सर्व्हियर या फाऊंडेशनद्वारे संचालित स्वतंत्र फ्रेंच फार्मास्युटिकल ग्रुपने हिंदुस्थानात ‘गॅटिन’ची स्थापना केली आहे. या प्लॅटफॉर्मअंतर्गत भागीदारांसोबत काम करत कार्डियोमेटाबोलिक व शिरासंबंधित आजारांसाठी सिंगल पिल कॉम्बीनेशन्स विकसित, उत्पादित व निर्यात करण्यात येतील. यावेळी गॅटिनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर डॉ. क्षितिज पानसे, कॉर्पोरेट स्ट्रटेजी अँड ट्रान्सफॉर्मेशनच्या कार्यकारी उपाध्यक्ष श्रीमती शार्लेट मार्मोसेझ उपस्थित होते.
जिओ हॉटस्टारची चॅट जीपीटी-ब्रँडेड स्ट्रीमिंग सेवा
जिओ हॉटस्टारने चॅट जीपीटी-ब्रँडेड संवादात्मक स्ट्रीमिंग सेवा सुरू केली आहे. यावेळी जिओ स्टारचे व्हाइस चेअरमन उदय शंकर, ओपनएआयमधील अॅप्लीकेशन्स विभागाच्या सीईओ फिडजी सिमो उपस्थित होते. ओपनएआय एपीआयच्या मदतीने व्हॉइस आणि टेक्स्ट इंटरफेस वापरकर्त्यांना विविध भाषांमधील सर्वात मोठय़ा स्ट्रीमिंग लायब्ररीचा आनंद घेण्यास मदत मिळणार आहे. जिओ हॉटस्टार ‘काय पाहावे?’ यासाठी मल्टीलिंग्वल कॉग्निटिव्ह सर्च सादर करण्यात आले आहे. ही सेवा लाईव्ह, ऑन-डिमांड अशा दोन्ही स्वरूपांत टप्प्याटप्प्याने सादर होणार आहे.
ऑरगॅनिक बॅटर लाँच
फ्रेश फूड ब्रँड आयडी फ्रेश फूडने ऑर्गेनिक सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची घोषणा करत आयडी ऑरगॅनिक बॅटर लाँच केले आहे. हा लाँच आयडीच्या त्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. यावेळी आयडी फ्रेश फूडचे सीईओ रजत दिवाकर उपस्थित होते.
ईव्ही चार्जिंग स्टेशन
लक्झरी कार ब्रँड व्होल्वो इंडिया आणि ईव्ही चार्ंजग नेटवर्क चार्जझोनने मुंबई-नाशिक महामार्गावर अल्ट्रा-फास्ट चार्ंजग स्टेशन लाँच केले. या चार्ंजग स्टेशनमध्ये 360 केडब्ल्यू स्टार चार्ज पॉवर युनिटसह 2 डायनॅमिक लोड बॅलन्सिंग डिस्पेन्सर्स आहेत.
पार्ले अॅग्रोचे स्मूद केसर बदाम लाँच
पार्ले अॅग्रोने आपल्या फ्लॅगशिप डेअरी बेव्हरेज ब्रँड स्मूदमध्ये नवीन भर म्हणून स्मूद केसर बदाम लाँच केले आहे. यावेळी पार्ले अॅग्रोच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि सीएमओ नादिया चौहान उपस्थित होत्या. स्मूद केसर बदाममध्ये बदामाचे गुणधर्म आणि केशरची ऊब, मऊ आणि क्रीमी दुधासह एकत्र करून स्मूदच्या खास शैलीत प्रीमियम आल्हाददायक अनुभव देते.
कोटक एज्युकेशनचा सामंजस्य करार
कोटक एज्युकेशन फाऊंडेशनने भारतातील शिक्षण क्षेत्रात एआयला चालना देण्यासाठी भारतजेन टेक्नॉलॉजी फाऊंडेशनसोबत सामंजस्य करार केला आहे. या करारावर केईएफचे सीईओ गणेश राजा, सीओओ (एज्युकेशन) जयश्री रमेश आणि डायरेक्टर (एज्युकेशन) कविता संघवी यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱया करण्यात आल्या. यावेळी वरिष्ठ वैज्ञानिक वेंकटापथी उपस्थित होते.
इन्फिनिक्सचा नोट एज फोन लाँच
इन्फिनिक्सने ‘नोट एज’ हा नवा स्मार्टपह्न लाँच केला. या फोनला तीन व्हेरियंटमध्ये आणले असून 6 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेज पह्नची किंमत 21,999 रुपये आहे. तर 8 जीबी रॅम प्लस 256 जीबी स्टोरेजची किंमत 25,999 रुपये आहे. पह्नमध्ये थर्ड कर्व्ह अमोलेड डिस्प्ले, 6.78 इंचाचा डिस्प्ले, 6500 एमएएच क्षमतेची बॅटरी, 50 मेगापिक्सलचा पॅमेरा दिला आहे.


























































