‘एआय’मध्ये अवतरले भगवान कृष्ण अन् अर्जुन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीतील ‘एआय इम्पॅक्ट समिट 2026’मध्ये अखेरच्या दिवशी महाभारतातील भगवान कृष्ण आणि योद्धा अर्जुन यांची प्रतिमा हायटेक डिजिटल अवतारात दिसली. धर्म काय आहे? आपल्या आत सर्वात मोठा शत्रू कोण? आयुष्यात अन्याय दिसल्यास काय करायला हवे? अशा प्रश्नांची उत्तरे एआय निर्मित कृष्ण अन् अर्जुन यांच्याकडून दिली जात होती. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जिओ इंटेलिजेन्स पॅव्हेलियनमध्ये कंपनीने ‘महाभारत ः एक धर्मयुद्ध’ नावाच्या मालिकेची झलक दाखवली. हे संपूर्ण एआय निर्मित आहे. याला कंपनीने काही महिन्यांपूर्वीच लाँच केले होते.