
येत्या 19 मार्चला बॉक्स ऑफिसवर दोन मोठय़ा चित्रपटांमध्ये टक्कर होणार आहे. एकाच दिवशी रणवीर सिंहचा बहुप्रतीक्षित धुरंधर-2 आणि दाक्षिणात्य सुपरस्टार यशचा ‘टॉक्सिक’ प्रदर्शित होत आहेत. ‘टॉक्सिक’मध्ये यशचा डबल रोल असल्याने या चित्रपटांकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. या चित्रपटात हुमा कुरेशी, कियारा अडवाणी, नयनतारा, तारा सुतारिया यांच्या भूमिका आहेत. तर ‘धुरंधर-2’ हा धुरंधरचा सिक्वेल सिनेमा आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आहे. आता याच्या दुसऱ्या भागाकडे सिनेमा प्रेमींच्या नजरा लागल्या आहेत. या चित्रपटात रणवीर सिंहसह अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन यांच्या भूमिका आहेत.


























































