
1 टीव्ही सुरू असताना अचानक वीज गेल्यास टीव्हीचे नुकसान होण्याची शक्यता असते. काही सोप्या उपायांनी हे नुकसान टाळता येते.
2 वीज गेल्यावर टीव्हीचा प्लग सॉकेटमधून काढून टाकावा, जेणेकरून वीज परत आल्यावर होणाऱ्या ‘पॉवर सर्ज’पासून टीव्ही सुरक्षित राहील.
3 टीव्ही सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमी ‘सर्ज प्रोटेक्टर’ असलेल्या एक्सटेन्शन बॉक्सचा वापर करावा. लाइट आल्यानंतर लगेच टीव्ही चालू करू नका.
4 लाइट आल्यावरही टीव्ही चालू होत नसेल, तर पॉवर सप्लाय बोर्ड किंवा मेन बोर्डमध्ये बिघाड असू शकतो. आधी त्याची तपासणी करा.
5 टीव्ही चालू होतो पण स्क्रीनवर चित्र दिसत नाही, तर ते बॅकलाइट निकामी झाल्याचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत टीव्ही मेकॅनिकला दाखवा.






























































