‘बुंग’ चित्रपटाला लंडनमध्ये पुरस्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फरहान अख्तर च्या एक्सेल इंटरटेनमेंटकडून निर्मित केलेला आणि मणिपूरच्या पार्श्वभूमीवर बनवलेल्या ‘बुंग’ या चित्रपटाला लंडनमध्ये ‘बेस्ट चिल्ड्रेन फिल्म अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी चित्रपट निर्माता फरहान अख्तर, रितेश सिधवानी आणि सहायक दिग्दर्शक राहुल शारदा हे उपस्थित होते. सिनर्स आणि फ्रैंकेंस्टाइन चित्रपटाने प्रत्येकी तीन-तीन पुरस्कार पटकावले. पॉल थॉमस एंडरसन यांना ‘वन बॅटल आफ्टर अनदर’ साठी सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक म्हणून गौरवण्यात आले.