राष्ट्रपती भवनात लुटियन्स यांचा पुतळा हटवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात मध्यवर्ती भागात अनेक दशकांपासून असलेल्या एडवीन लुटियन्स यांचा अर्धाकृती पुतळा हटविण्यात आला आहे. त्या जागेवर एकमेव हिंदुस्थानी गव्हर्नर जनरल सी. राजगोपालाचारी यांचा अर्धाकृती कांस्य पुतळा बसवण्यात आला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. एडवीन लुटियन्स हे ब्रिटिश वास्तुविशारद होते. त्यांनी दिल्लीतील अनेक ब्रिटिशकालीन इमारतींची रचना केली होती. राष्ट्रपती भवनात अशोक मंडपाजवळ त्यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला होता. त्या ठिकाणी राजगोपालाचारी यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले.