
मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलाशेजारी असलेल्या भूखंडावरील अतिक्रमण हटवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत.
हा भूखंड विद्यापीठाचा आहे. त्यावर अतिक्रमण झाले आहे. येथे एसआरए योजना राबवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ही मंजुरी रद्द करावी. या भूखंडाचा ताबा विद्यापीठाला मिळावा, अशी मागणी करणारी याचिका विद्यापीठाने अॅड. युवराज नरवणकर यांच्यामार्फत दाखल केली होती.
न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. आरती साठे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. हा भूखंड विद्यापीठाला दिल्याची जिल्हाधिकारी कार्यालयात असलेली नोंद अॅड. नरवणकर यांनी सादर केली. त्याची दखल घेत न्यायालयाने पालिकेला हे आदेश दिले व ही याचिका निकाली काढली.
1987च्या नोंदीप्रमाणे मिळणार भूखंड
जिल्हाधिकारी कार्यालयाने 1987मध्ये हा भूखंड विद्यापीठाला दिल्याची नोंद केली आहे. त्यानुसार सिटी सर्व्हे कार्यालयाने
या भूखंडाला पुंपण घालावे, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.





























































