
ब्रिटिश एअरवेजच्या बोईंग ७८७ विमानात तांत्रिक बिघाड झाला त्यानंतर या विमानाला आपत्कालीन लॅंडिंग करावे लागले. नागपूरच्या विमानतळावर या विमानाने आपत्कालीन लॅंडिंग केले. या विमानात १६९ प्रवासी होते. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.
ब्रिटिश एअरवेजचे बोईंग ७८७ विमान लंडनहून हैदराबादला जात होते, परंतु हैदराबादमध्ये खराब हवामानामुळे लँडिंगची परवानगी नाकारण्यात आली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, वैमानिकाने विमान नागपूरकडे वळवले. त्याने हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क साधला आणि आपत्कालीन लँडिंगची परवानगी मागितली. नागपूर एटीसीकडून परवानगी मिळाल्यानंतर, विमान सुरक्षितपणे उतरले.





























































