केरळ नव्हे केरळम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘गॉड्स ओन कंट्री’ अशी ओळख असलेल्या केरळ राज्याला आता नवी ओळख मिळाली आहे. केरळचे नामांतर ‘केरळम’ असे करण्यात आले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज या प्रस्तावाला मंजुरी दिली. केरळमधील  निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा आहे. राज्य सरकारने 2023 साली नामांतराचा ठराव मंजूर केला. हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला. केंद्राने पहिल्या प्रस्तावात काही तांत्रिक सुधारणा सुचवल्या होत्या. त्यानंतर 2024 मध्ये राज्य सरकारने सुधारित ठराव करून पाठवला होता.