
टिळकनगर येथे मराठी राजभाषा गौरव दिन तसेच भव्य मिरवणूक व पुस्तक पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ज्योती मोरे अँड ग्रुप प्रेझेंट्स – स्वर मेघ मल्हार म्युझिकल कराओके स्टुडिओ यांच्या वतीने हा कार्यक्रम 27 फेब्रुवारीला सायंकाळी 6 ते 10 दरम्यान होईल. मराठी भाषा दिनानिमित्त समाजात भाषाप्रेम, वाचन संस्कृती आणि साहित्यिक वारसा याबाबत जनजागृती करण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. याअंतर्गत स्वामी समर्थ हॉल ते सहकार सिनेमा चौक अशी मिरवणूक निघेल.



























































