
स्वतःचे हक्काचे घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी घेतलेले 25-30 वर्षांचे गृहकर्ज अनेकदा मानसिक-आर्थिक ओझे बनू लागते.
निवृत्तीपर्यंत ईएमआय भरत राहिल्याने बचतीवर मर्यादा येतात. पण योग्य आर्थिक शिस्त आणि प्री-पेमेंटच्या काही स्मार्ट ट्रिक्स वापरल्यास कर्ज लवकर फेडता येते.
कर्ज लवकर संपवण्यासाठी सुरुवातीची 5-7 वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात. वर्षाच्या 12 महिन्यांत 12 ऐवजी 13 हप्ते (ईएमआय) भरण्याचे नियोजन करा.
दरवर्षी नोकरीत पगारवाढ मिळते. याच प्रमाणात तुमचा ईएमआयदेखील वाढवा. दरवर्षी ईएमआयमध्ये केवळ 7.5 ते 10 टक्केवाढ केली तर मोठा फरक पडतो.
तुम्हाला 10 वर्षांच्या आत घर कर्जमुक्त करायचे असेल तर वरील दोन्ही पद्धती एकत्र वापरा. दरवर्षी एक अतिरिक्त ईएमआय आणि दरवर्षी हप्त्यात 10 टक्के वाढ करा.
How to Repay Your Home Loan Faster: Smart Prepayment Strategies
Learn how to become debt-free sooner with easy financial tips like increasing your EMI by 10% annually or paying one extra installment every year.



























































