
मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांची अखेर घोषणा करण्यात आली आहे. त्यात शिवसेनेकडून सचिव साईनाथ दुर्गे, माधुरी मांजरेकर आणि कैलास पाठक यांना संधी मिळाली आहे. एकूण दहा स्वीकृत नगरसेवक असतील त्यात भाजपचे 4, शिवसेनेचे 3, शिंदे गटाचे 2 तर काँग्रेसचा एक सदस्य असेल.
मुंबई महापालिकेत दरवेळी 5 जणांची स्वीकृत नगरसेवक म्हणून नावे जाहीर केली जातात. यावेळी 10 जणांना स्वीकृत म्हणून संधी मिळाली आहे. ही संधी कोणाला मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महापौर रितू तावडे यांनी बंद लिफाफा उघडून त्यातील स्वीकृत सदस्यांची नावे जाहीर केली. स्वीकृत नगरसेवकाच्या जागा संख्याबळानुसार ठरतात. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी नावे पालिकेकडे पाठवण्यात आली होती. या नावांच्या अर्जांची छाननी केल्यानंतर महापौर तावडे यांनी सभागृहात घोषणा केली.
भाजप – डॉ. नितेश सिंह, प्रवीण छेडा, प्रतीक करपे, कमलाकर दळवी
शिंदे गट – राज सुर्वे, उमेश माने
काँग्रेस – वीरेंद्र चौधरी






























































