घरांसाठी गिरणी कामगारांची 10 मार्चला विधान भवनावर धडक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 गिरणी कामगारांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी न लावल्यास 10 मार्च रोजी कामगार आणि वारस विधान भवनावर धडकतील, असा इशारा संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या वतीने देण्यात आला आहे.

संयुक्त मराठी मुंबई चळवळीच्या वतीने करी रोड येथे गिरणी कामगार व वारसांची भव्य सभा उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडली. गिरणी कामगारांना मुंबईत घर देण्यासाठी स्पष्ट, कालबद्ध व नियोजित आराखडा जाहीर करावा आणि त्या माध्यमातून गिरणी कामगारांना मुंबईतील घराची हमी देणारी इरादापत्रे तत्काळ वितरित करावीत, वंचित गिरणी कामगारांना पुन्हा नव्याने अर्ज करण्याची एक संधी देण्यात यावी, तसेच 1981 च्या संपातील गिरणी कामगारांनाही सदनिकेच्या प्रकल्पामध्ये सामावून घेण्यात यावे, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.