
राज्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती व अनुकंपा भरती प्रक्रियेबाबत शासन सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत सांगितले. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती व अनुकंपा भरती याविषयी सदस्य सुधाकर अडबाले यांनी लक्षवेधी उपस्थित केली होते. या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री भुसे म्हणाले, 21 फेब्रुवारी 2024 ते 28 मे 2025 या कालावधीत झालेल्या नियुक्त्यांची विहित कार्यपद्धतीनुसार तपासणी करून संच मान्यता, अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन आदी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सुधारित अनुकंपा धोरण लागू करण्यात आले असून पात्र प्रकरणे तत्काळ निकाली काढण्याचे निर्देश दिले जातील असे शिक्षणमंत्र्यांनी सांगितले.


























































