
वाघांसाठी 2025 हे वर्ष काळ ठरले. या एका वर्षात राज्यात 41 वाघांचा मृत्यू झाला. त्यातील 28 वाघ नैसर्गिकरीत्या, 8 वाघ अपघातात तर विजेचा धक्का लागल्याने 4 वाघ मृत्युमुखी पडले. शिकाऱ्याने एका वाघाला गोळी घातली. वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत ही माहिती तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. शिवसेना आमदार मनोज जामसुतकर यांनी तारांकित प्रश्नाद्वारे हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. नैसर्गिक व मानवनिर्मित कारणांमुळे वाघांचा मृत्यू होऊ लागल्याने राज्यातील जैवविविधता धोक्यात आली असून वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली, असा प्रश्न जामसुतकर यांनी उपस्थित केला.



























































