सोने तस्करीनंतर रान्याला मिळायचे पाच लाख, ईडीच्या आरोपपत्रातून धक्कादायक खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कन्नड अभिनेत्री रान्या राव हिचे नाव 103 कोटी रुपयांच्या सोने तस्करीच्या आरोपपत्रात ईडीने नाव समाविष्ट केले आहे. ईडीच्या आरोपानुसार, अवघ्या एका वर्षात या टोळीने 127 किलोहून अधिक सोने हिंदुस्थानात आणले असून ज्वेलर्सच्या नेटवर्कद्वारे विकले आहे. एक किलो सोन्याची तस्करी केल्यानंतर रान्या राव हिला 4 ते 5 लाख रुपये कमिशन म्हणून मिळत होते, असा धक्कादायक खुलासा ईडीच्या आरोपपत्रातून समोर आला आहे.

रान्या राव हिच्या शिवाय, ईडीने तिचा साथीदार तरुण आणि बेल्लारीच्या सोने व्यापारी साहिल सकारिया जैन यांचे नावही प्रॉसिक्युशन तक्रारीत घेतले आहे. ही तक्रार ईडीच्या चार्जशीटइतकीच महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण आरोपपत्र पीएमएलए कोर्टात दाखल करण्यात आले आहे. गेल्या वर्षी बंगळुरू विमानतळावर रान्या राव हिला 14.2 किलो सोन्याची तस्करी करताना पकडले होते.