आता सोन्याच्या बदल्यात जास्त कर्ज मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सोने खरेदी करणे ही एक सुरक्षित गुंतवणूक समजली जाते. आर्थिक अडचणीच्या काळात सोने गहाण ठेवून कर्ज घेता येते. अतिशय कमी वेळेत सोन्यावर कर्ज मिळते. इतर कर्जांच्या तुलनेत सोन्याच्या कर्जावरील व्याजदर वेगळे असतात. सोने कर्ज प्रक्रियेत लोन टू व्हॅल्यू (एलटीव्ही) महत्त्वाचे असून त्यावरून तुम्हाला किती कर्ज मिळेल हे निश्चित केले जाते. या वर्षापासून रिझर्व्ह बँकने गोल्ड लोनच्या नियमाबाबत काही बदल केले आहेत. नवीन नियमांनुसार, 2.5 लाख रुपयांचे कर्ज काढण्यासाठी तुमच्या सोन्याच्या मूल्याच्या 85 टक्के कर्ज  (एलटीव्ही) मिळवता येईल. याआधी ही मर्यादा 75 टक्के एवढी होती. 2. 5 ते 5 लाखांपर्यंतच्या कर्जासाठी 85 टक्के एलटीव्ही, तर पाच लाखांपेक्षा अधिकच्या कर्जासाठी 75 टक्के एलटीव्ही आहे.

गोल्ड लोन फक्त सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या नाण्यांवर मिळते. आरबीआयच्या नियमानुसार, गोल्ड बार, गोल्ड बिस्किट अथवा गोल्ड ईटीएफवर गोल्ड लोन दिले जात नाही. बँका अथवा गोल्ड लोन देणाऱया संस्था या दागिन्यांवर कर्ज देतात.

सोन्याबरोबर आता चांदीवरही कर्ज मिळवता येते. आतापर्यंत बँका केवळ सोने तारण ठेवून कर्ज देत होत्या. मात्र आता चांदीचे दागिने किंवा 500 ग्रॅम चांदीची नाणी तारण ठेवता येतील. सध्याच्या दरानुसार, आता प्रति ग्रॅम 11 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकते. उदाहरणार्थ, एसबीआय गोल्ड लोनची मर्यादा ही 50 लाख रुपयांपर्यंत आहे. गोल्ड का@ईनवर कर्ज घेणार असाल तर एपूण वजन हे फक्त 50 ग्रॅमपर्यंत मान्य आहे.