
शेतकरी कर्जमाफीबाबत आपण समिती केली आहे. कर्जमाफीबाबत जे आश्वासन दिले ते उचित वेळी पूर्ण केले जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. त्यामुळे विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा होणार नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची अर्थव्यवस्था, गुंतवणूक, सरकारी नोकर भरती अशा विविध विषयांवर भाष्य केले.
महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची
महाराष्ट्रात सक्ती मराठी भाषेचीच सक्ती राहील असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. नाशिक कुंभमेळय़ाच्या माध्यमातून जगात महाराष्ट्राचे ब्रँडींग करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.




























































