ट्रेंड – जेईई टॉपरचा डान्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जेईई मेन 2026च्या परीक्षेत 100 परसेंटाईल टॉपर अर्नव गौतम या विद्यार्थ्याचा डान्स सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अर्नवने जेईई परीक्षेत 300पैकी 300 गुण मिळवले आहेत. या व्हिडीओत आई-वडील आणि शिक्षकांसोबत अर्नव डान्स करताना दिसत आहे. परंतु त्याला नाचता येत नाही. हे पाहून अनेक युजर्सने वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. विद्यार्थी दशेत विद्यार्थ्याने केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. अर्नव अभ्यासात एवढा मग्न होता की, तो इतर मुलांप्रमाणे नाचू शकत नाही. त्याचा फोकस केवळ अभ्यासावर होता. बाकीच्या मुलांमध्ये आणि त्याच्यामध्ये हाच मुख्य फरक आहे, अशा कमेंट युजर्सनी केल्या आहेत.