सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची निवड करण्यात आली. वरळी डोम येथे आज पार पडलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावाची औपचारिक घोषणा करण्यात आली. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादीच्या संघटनात्मक रचनेत फेरबदल करण्यात आले आहेत.

मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकी कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. उपस्थित सर्व सदस्यांनी हात उंचावून पाठिंबा दिला. यानंतर पटेल यांनी सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याचे जाहीर केले.