Breaking – दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कथित मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची दिल्लीतील राऊज अवेन्यू कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. यावेळी कोर्टाने आरोपीविरोधात गुन्हा सिद्ध होण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याने त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचे सांगितले.

न्यायालय फक्त दाव्यांवर काम नाही करत, आम्ही आरोपांवर तेव्हाच विश्वास ठेवतो जेव्हा आरोपीविरोधात पुरेसे ठोस पुरावे असणार. तपास यंत्रणांनी त्यांच्याविरोधात सादर केलेले पुरावे हे अतिशय तकलादू आणि आरोप सिद्ध करण्यास पुरेसे नाहीत; असे न्यायालयाने सांगितले आहे.