
उन्हाळ्यात अन्न आणि पेये खराब होण्याची शक्यता जास्त असते. थोड्याशा निष्काळजीपणामुळे ठेवलेले दूध देखील खराब होऊ शकते. उन्हाळ्यात तुमच्याही घरातील दूध खराब होत असेल तर, काही महत्त्वाच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात दूध खराब होऊ नये म्हणून, ते वारंवार गरम करा. दूध खराब होण्यापासून रोखण्यासाठी, दर तीन ते चार तासांनी ते पुन्हा गरम करा. गरम दूध कधीही पूर्णपणे झाकून ठेवू नका. असे केल्याने दूध लवकर खराब होईल.
तुम्ही दूध उकळायला विसरलात आणि ते खराब होईल असे वाटत असल्यास, त्यात चिमूटभर बेकिंग सोडा घाला आणि नंतर ते उकळवा. यामुळे दूध खराब होणार नाही. जास्त बेकिंग सोडा घालू नका, कारण यामुळे दुधाची चव बिघडु शकते.
तुमच्या घरी रेफ्रिजरेटर नसेल, किंवा ते तुटलेले असेल किंवा काम करत नसेल, तर दूध चांगले उकळवा. नंतर ते थंड होऊ द्या. एका मोठ्या भांड्यात पाणी भरा आणि दूध पंख्याखाली ठेवा. यामुळे दूध खराब होणार नाही.
कधीकधी लोक जुन्या दुधाच्या टोपात नवीन दूध गरम करतात. त्यामुळे दूध खराब होण्याचा धोका अधिक असतो. उन्हाळ्यात दूध स्वच्छ टोपामध्ये उकळवले पाहिजे. तसेच दुधाचा टोप हा वारंवार बदलु नये.
पॅकेज्ड दूध जास्त काळ उकळू नये असा सल्ला तज्ञ देतात. कारण पाश्चराइज्ड दूध पुन्हा गरम करण्याची आवश्यकता नसते. ते पुन्हा गरम केल्याने त्याचे पौष्टिक मूल्य कमी होते.





























































