
गुंतवणूकदारांसाठी शेअर बाजारातील घसरण हा चिंतेचा विषय आहे. गुंतवणूकदारांच्या म्युच्युअल फंड पोर्टपहलिओमध्ये, एसआयपीमध्ये तोटा दिसत आहे.
अशावेळी एसआयपी बंद करावी का, असा विचार गुंतवणूकदारांच्या मनात येतो. पण ऐनवेळी एसआयपी थांबवणं किंवा बंद करणं नुकसानीचे ठरू शकते.
अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूक सुरू ठेवणे योग्य. काही महिन्यांनी परिस्थिती पूर्वपदावर येऊ शकते. तुमचा गुंतवणूक कालावधी आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेचा अंदाज घ्या.
बाजारीतल घसरण इक्विटी गुंतवणुकीचा सर्वसाधारण भाग आहे. जेव्हा बाजार कोसळतो तेव्हा एसआयपीद्वारे कमी किंमतीत अधिक यूनिट खरेदी करता येतात.
गुंतवणूक थांबवणं दीर्घकालीन गुंतवणुकीच्या क्षमतेला नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे घाबरण्याऐवजी गुंतवणुकीत शिस्त कायम ठेवणे आवश्यक आहे.
























































