
जेव्हा तुम्हाला स्ट्रेस जाणवेल तेव्हा एका जागी शांत बसा आणि खोलवर दीर्घ श्वास घ्या, सोडा. ही प्रक्रिया 2 ते 3 मिनिटे सतत करा. दुसरा उपाय म्हणजे फक्त 2 मिनिटांसाठी आपले डोळे मिटा. डोळे मिटल्यानंतर एखाद्या शांत-निसर्गरम्य ठिकाणाची कल्पना करा.
ऑफिसमध्ये काम करताना दर 60 मिनिटांनी किमान 1 मिनिटाचा ‘स्ट्रेचिंग ब्रेक’ घेणे आवश्यक आहे. आपल्या दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासून ते गरम करा आणि डोळे मिटून हळूवारपणे त्यावर ठेवा. काही प्रमाणात ‘स्ट्रेस हार्मोन्स’ कमी होतात.
























































