कुर्ला, शिवाजीनगर, गोवंडी येथील तिघा तरुणांच्या घरांची झडती; बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांच्या संपर्कात एटीएसची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सरकारने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या तिघा तरुणांना दहशतवादविरोधी पथकाने आपल्या रडारवर घेतले आहे. एटीएसच्या पथकाने त्या तरुणांच्या घरांची झडती घेऊन तिघांचे मोबाईल ताब्यात घेतले. या प्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येते.

कुर्ला, शिवाजीनगर, गोवंडी येथील काही तरुण केंद्र सरकारने बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची माहिती दहशतवादविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार एटीएसच्या पथकांनी याची गंभीर दखल घेत त्या तिघांच्या घरावर धडक दिली. घरांची झडती घेऊन त्यांचे मोबाईल जप्त केले. पुढील कारवाईकरिता तिघांचे मोबाईल न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. दरम्यान त्या तिघांची चौकशी करण्यात आली. या प्रकरणी आणखी कसून चौकशी तिघांकडे केली जाणार असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आहोत. दहशतवादी कट-कारस्थानाच्या पार्श्वभूमीवर आपण बऱयाच काळापासून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवून होतो. त्यानुसारच छापेमारीची योजना आखण्यात आली होती, अशी माहिती एटीएसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.