
भररस्त्यात आमच्यासोबत फोटो काढ असे म्हणतं एका परदेशी तरुणीची छेड काढणाऱया दोघांना आग्रीपाडा पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. एका परदेशी महिलेने तिला दोन तरुण छेडून त्रास देत असल्याचे चित्रीकरण इंस्टाग्रामवर प्रसारित केले होते. हे चित्रीकरण झपाटय़ाने प्रसारित होताच आग्रीपाडा पोलिसांनी इंस्टाग्राम आयडीवरून त्या परदेशी महिलेला संपर्क साधला. त्या महिलेने दिलेल्या तक्रारीवरून आग्रीपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्या तरुणांचा शोध सुरू केला. तांत्रिक तपास व सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी मलबार हिल येथे बांधकाम साईटवर काम करणाऱया गुलशनकुमार शर्मा (20) याला पकडले. त्यानंतर या गुह्यातील मुख्य आरोपी मनसुखकुमार शर्मा (22) याला बिहार येथून अटक केली.
























































