अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर निषेध नोंदवणाऱ्या कश्मिरच्या खासदाराविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जम्मू कश्मिर पोलिसांनी श्रीनगरचे खासदार आगा सय्यद रुहुल्लाह मेहदी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. सोशल मीडियावर दिशाभूल करणारे वक्तव्य केल्याने हा गुन्हा दाखल केला आहे. जगभरातील शिया मुस्लिमांमध्ये आदरणीय असलेले अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येनंतर, जम्मू कश्मिरमध्ये निषेध नोंदवला जात आहे. मेहदी यांनी सोमवारी कश्मिरमधील निदर्शनांचे आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झालेल्या चकमकींदरम्यान एका महिला निदर्शकावर झालेल्या कथित हल्ल्याचे व्हिडिओ अपलोड केले होते.

एफआयआर दाखल झाल्यानंतर प्रत्युत्तर देताना, रुहुल्लाह यांच्या कार्यालयाने एक्स वरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ज्या प्रशासनाला एका सार्वभौम राष्ट्राचा नेता मरण पावल्यानंतर निषेध करता आला नाही. तेच प्रशासन आता ज्याने हे केले त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे धाडस करत आहे.”

पोलिसांनी सांगितले की, श्रीनगरचे खासदार आणि शहराचे माजी महापौर जुनैद अझीम माटू यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. या एफआरआय अंतर्गत डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर भीती निर्माण केली आहे असे म्हटले आहे. तसेच खोट्या, बनावट आणि दिशाभूल करणारी पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चुकीची माहिती पसरवण्याचे असे जाणूनबुजून केलेले प्रयत्न शांतता, सुरक्षा आणि एकूणच स्थिरतेसाठी गंभीर धोका निर्माण करतात,” असे पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, तसेच चौकशी सुरू आहे आणि पुढील कारवाई केली जाईल असे म्हटले आहे.