
टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबारात एका हिंदुस्थानी विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. सविता षन्मुगसुंदरम असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती मूळची हिंदुस्थानची होती. हल्लेखोर नडियागा डायग्ने (वय 53) याने केलेल्या हल्ल्यात सविता शान (21), राइडर हॅरिंगटन (19) आणि जॉर्ज पेडरसन (30) या तिघांचा मृत्यू झाला आहे, तर 14 लोक जखमी झाले आहेत. पोलीस अधिकारी व्हिडीओ फुटेजच्या आधारावर तपास करत आहेत. सविता ही मॅनेजमेंट इन्पर्ह्मेशन सिस्टम्स अँड इकोनॉमिक्स कोर्सची शिक्षण घेत होती. सविता मे 2026 मध्ये पदवीधारक होणार होती.

























































