मुंबईत रेकॉर्डब्रेक तापमान! पारा थेट 39 अंशांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत बुधवारी रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद झाली. होळीची सुरुवात होताच संपूर्ण राज्यभरात उन्हाची दाहकता वाढत असताना मुंबईकरांनाही दिवसभर तीव्र उन्हाचे चटके बसले. दुपारी उन्हातून चालताना घाम फुटला… दम निघाला. या महिलेने तर आपल्या चिमुकल्याला उन्हाच्या झळा लागू नयेत म्हणून ओढणीने झाकले. हवामान खात्याच्या नोंदीनुसार दुपारी सांताक्रुझमध्ये कमाल तापमान 39 अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. गुरुवारीही तापमान चढे राहण्याचा अंदाज आहे.