
प्रायव्हसी म्हणून आपण आपल्या मोबाईल पह्नला पासवर्ड ठेवतो. पण कधी कधी आपण पासवर्ड विसरून जातो. अँड्रॉईड फोनमध्ये पासवर्ड रिसेट करता येतो.
तुम्हाला सर्विस सेंटरच्या रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचा फोन घरी बसून पुन्हा अनलॉक करू शकता.
तुम्ही अँड्रॉइड फोन वापरत असाल, तर गुगल तुमची मोठी मदत करू शकते. चुकीचा पासवर्ड टाकल्यास फोन `Forgot Password चा पर्याय देतो.
या पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्ही तुमच्या गुगल अकाऊंटच्या मदतीने फोन रीसेट करू शकता. लॉगिन करण्यासाठी आधीच्याच जीमेल आयडीचा वापर करा.
लॉगिन झाल्यावर पह्न फॅक्टरी रीसेट होईल आणि तुम्ही नवीन डिव्हाइसप्रमाणे त्याची सेटिंग करू शकता. जुना डेटा डिलीट होऊ शकतो, त्यामुळे डेटा बॅकअप घ्या.




























































