
16 व्या शतकातील संत थिरुमनकाई अलवर यांची कांस्य मूर्ती ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या अॅशमोलियन संग्रहालयाने हिंदुस्थानला परत केली आहे. हिंदुस्थानात मूर्ती आल्यानंतर ती तामीळनाडूतील थाडिकोम्बु येथील श्री सौंदराजा पेरुमल मंदिराला परत केली जाईल. ही मूर्ती त्या चार पवित्र कलाकृतींपैकी एक होती जी 1957 ते 1967 दरम्यान मंदिरातून चोरी झाली होती. या मूर्तीची किंमत कोटय़वधी रुपयांमध्ये आहे. हिंदुस्थानातून चोरी झालेल्या मूर्ती बेकायदेशीरपणे विकून त्यांची परदेशात तस्करी करण्यात आली होती. परंतु आता ही तांब्याची मूर्ती हिंदुस्थानकडे सोपवली आहे.


























































