
टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमधील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बांगलादेशविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी संघ जाहीर केला असून माजी कर्णधार बाबर आझम आणि सईम अयूब यांचा पत्ता कट केलाय.
वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीकडेच संघाचे नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे. याशिवाय यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानलाही संघात स्थान मिळाले आहे.
संघात सहा अनपॅप्ड खेळाडूंना संधी देण्यात आली असून, शाहिबझाद फरहानचाही समावेश करण्यात आला आहे. तसेच सलमान अली फहीम अश्रफ आणि अबरार अहमद यांनाही संघात स्थान देण्यात आले आहे.
पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांची वन डे मालिका 11 मार्चपासून सुरू होणार आहे. सर्व सामने ढाक्यातील शेर-ए-बांगला स्टेडियमवर होणार आहेत.
पाकिस्तानचा वन डे संघ
शाहीन शाह आफ्रिदी (कर्णधार), अब्दुल समद, अबरार अहमद, फहीम अशरफ, फैसल अक्रम, हारिस रऊफ, हुसेन तलत, माज सदाकत, मोहम्मद रिजवान (यष्टिरक्षक), मोहम्मद वसीम ज्युनियर, गाजी घोरी (यष्टिरक्षक), साद मसूद, साहिबजादा फरहान, सलमान अली आगा, शामिल हुसेन.



























































