
महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून विष्णूदेव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विष्णूदेव वर्मा हे तेलंगणाचे राज्यपाल होते. 8 राज्यांमधील राज्यपाल बदलण्यात आले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नव्या नियुक्त्यांना मंजुरी दिली. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राचा अतिरिक्त प्रभार होता.
पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक ऐन तोंडावर आलेली असताना सी. व्ही. आनंद बोस यांनी बंगालच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या जागी तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवि यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लडाखचे नायब राज्यपाल कवींद्र गुप्ता यांची हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवप्रताप शुक्ला हे तेलंगणा, ले. जन. सईद अता हसनैन (निवृत्त) हे बिहारचे, नंद किशोर यादव यांची नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, तरणजीत सिंग संधू यांची दिल्लीचे आणि विनय कुमार सक्सेना यांची लडाखचे नायब राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे तामिळनाडूचा प्रभार सोपवण्यात आला आहे.

























































