पार्ल्यात रंगणार सांगितीक स्त्री सन्मान सोहळा; ‘आदिशक्ती अक्षरशक्ती’ पुरस्कारांचे वितरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून शनिवार, 7 मार्च रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ नाटयगृहात स्त्री सन्मान सोहळा रंगणार आहे. सायंकाळी 4 वाजता होणाया या सोहळ्यात विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना आदिशक्ती अक्षरशक्ती पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.

मुक्तांगणच्या माध्यमातून व्यसनाधीनांवर उपचार करणाया डॉ. मुक्ता पुणतांबेकर, एपिल्पसी रुग्णसेवेला समर्पित असलेल्या यशोधा चाकणकर, सुप्रसिद्ध गायिका सानिया पाटणकर, जेष्ठ कायदेतज्ञ क्रांती अरुण साठे, खगोलशास्त्रज्ञ श्वेता कुलकर्णी यांना यंदाचा ’आदिशक्ती अक्षरशक्ती’ पुरस्कार दिला जाईल. पार्श्वगायिका प्रमिला दातार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील, अशी माहिती ’हेमांगी’चे संपादक प्रकाश कुलकर्णी यांनी दिली. यावेळी उत्तरा मोने यांचा मिती ग्रुप सांगितीक कार्यक्रम सादर करणार असून गायक अजित परब, शार्दूल कवठेकर, मृण्मयी फाटक, संजना अरुण स्त्री केंद्रित गाणी सादर करतील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.