घाटकोपरच्या स्मशानभूमीत गुजराती भाषेतील पावत्या, शिवसेनेच्या दणक्याने पावत्या मराठीत छापल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घाटकोपर पूर्व स्मशानभूमीत गुजराती भाषेत पावत्या देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याला शिवसेनेने जोरदार विरोध दर्शवत आज  स्मशानभूमीच्या कार्यालयात जाऊन जाब विचारला. शिवसेनेच्या दणक्यानंतर घाटकोपर हिंदू स्मशानभूमी समितीने अवघ्या काही तासांत पावत्या मराठीत छापल्या.

गेल्या काही दिवसांपासून घाटकोपर पूर्व येतील स्मशानभूमीत गुजराती पावत्या दिल्या जात आहेत. त्याविरोधात विभाग क्रमांक 8चे विभागप्रमुख सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिक  स्मशानभूमी कार्यालयात पोचले. त्यांनी पावत्या मराठीत का नाही याची विचारणा ट्रस्टी निमेश यांच्याकडे केली. यावेळी घाटकोपर पूर्वचे उपविभागप्रमुख अजित भायजे, विधानसभा कार्यालय प्रमुख प्रकाश वाणी, विधानसभा समन्वयक प्रसाद कामतेकर, सहसमन्वयक सत्यवान कवळे, हृदयनाथ राणे, शाखाप्रमुख विशाल चावक, मयूरेश नामदास, महेंद्र भुते, सुनील भोस्तेकर, संतोष पिंगळे, अजय बोरस्ते, सुरेश करकेरा, कवठे आणि शिवसैनिक उपस्थित होते.