
पैठणी कधीही प्लास्टिक पिशवीत ठेवू नये. मलमल, सुती कापड किंवा कागदात गुंडाळून लाकडी कपाटात ठेवावी. साडीवर क्रीज पडू नये म्हणून दर तीन महिन्यांनी साडीची घडी बदलावी किंवा ती रोल करून ठेवावी.
पैठणी घरच्या घरी न धुता नेहमी प्रोफेशनल ड्राय क्लीनिंग करावी. पैठणीवर थेट इस्त्राr करू नये. गरम इस्त्री फिरवताना त्यावर सुती कापड ठेवावे. साडीवर अत्तर किंवा परफ्यूम थेट मारू नये, यामुळे डाग पडू शकतात.



























































