
>> मेधा पालकर
सारं काही घडय़ाळाच्या काटय़ावर असणारं आपलं जग. या जगात शांततेचा विसावा ठरणारी ठिकाणं हळूहळू कमी कमी होत असताना पुण्यातील पाषाण येथील शशिकला दगडे यांनी मात्र स्वतचं हिरवाईचं जग तयार केलं. अत्यंत निगुतीने परसदारी फुलवलेलं हे जग म्हणजेच ही परसबाग स्त्रीच्या सृजनात्मक स्वभावाचा आविष्कार दर्शवते.
शहरातले वाढते काँक्रीटचे जंगल, रासायनिक भाजीपाला, फळाफुलांवर होणारा रसायनांचा मारा… हे काही आपल्याला नवीन नाही. शहरात राहणाऱयांची तर यातून सुटका नाही हे आपण ठरवून टाकलेले असते. परंतु स्त्रीचा जात्याच असलेला नवनिर्मितीचा स्वभाव अशा परिस्थितीवर उत्तर शोधण्यासाठी तयार झाला की नवीन काहीतरी साध्य होतेच. पुण्यातल्या पाषाण येथे राहणाऱया शशिकला दगडे यांना पर्यावरणाची होणारी ही हानी बघवत नव्हती. यावर संपूर्णत उत्तर मिळणे अवघड आहे हे त्या जाणून होत्याच, मात्र किमान पर्यावरण रक्षणासाठी आपला हातभार लागावा या जाणिवेतून त्यांनी वेगवेगळे प्रयोग सुरू केले आणि यातून साकारली परसबाग.
सुरुवात झाली ती आपणच निर्माण केलेल्या कचऱयाचा पुनर्वापर कसा करता येईल या विचारातून. आपण रोज कचरा बाहेर फेकतो, हे कुठेतरी थांबले पाहिजे या जाणिवेतून आवड आणि गरज म्हणून त्यांनी अंगणात परसबाग फुलवली. तीव्र इच्छा आणि थोडे श्रम घेतले तर घरच्या कुंडीत वाया झाडांपासून अल्प प्रमाणात तरी पूर्णपणे सेंद्रिय अन्न मिळू शकते याची त्यांना खात्री पटू लागली. त्यातूनच ही फळं, भाज्या देणारी परसबाग त्यांनी फुलवली.
शशिकला सांगतात, ‘आम्ही शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे विविध बी-बियाणे, शेती, रोपण पद्धती या सर्वांची जाण आणि माहिती असल्यामुळे घर बांधतानाच परसबागेसाठी आम्ही जागा ठरवून ठेवली होती. घरच्या घरीच परसबागेतील समृद्धतेमुळे बाहेरील भाजीपाला आणण्याची वेळ शक्यतो येतच नाही. वेळात वेळ काबागेची काळजी घेतली जाते. फुलं, फळं आणि भाजी पिकवते. आजमितीला या बागेत सुमारे 30 प्रकारच्या भाज्या, फुलझाडे यात 10 ते 15 गुलाबाच्या विविध जाती, प्रकार आहेत. जास्वंद, लिली, अबोली, चाफा अशा विविध फुलांनी बाग फुलली आहे.
या बागेत अळू, कोथिंबीर, मेथी, पालक, कमिरची, घोसाळी, वांगी, टोमॅटो, फ्लॉवर, कोबी, गवार, वाल, चवळी, भोपळा, मुळा, गाजरासारख्या भाज्या पिकवल्या जातात. लिंब, पेरू, केळी, सीताफळ, चिकू, आंबा, अंजीर, आवळा, फणस्ह, जांभळे, लिची, मोसंबी अशी फळांची झाडे आहेत. याशिवाय काजू, सुका मेवा या झाडांनीदेखील बागेला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे. आज ही समृद्ध बाग बघण्यासाठी, अभ्यासण्यासाठी अनेक जण येतात.
सेंद्रिय शेती ही स्वयंपाकघरातल्या कचऱयावर वायेते, असं दगडे सांगतात, परसबाग केली. त्यामुळे कुटुंबाला सेंद्रिय अन्न, भाज्या तर मिळतातच आणि कचरा डेपोवरचा भारही हलका होतो. कुटुंबाचे पोषण आणि पर्यावरणाचे रक्षण, दोन्ही साधणारी ही टेरेसवरील शेती आनंदही देते.
या परसबागेमध्ये केवळ सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकवण्यावर भर आहे. कंपोस्ट व देशी गायींचं शेणखत यांचा वापर क्रमप्राप्त ठरतो. परसबागेत तीन फूट खोल खड्डय़ात एक फूट पालापाचोळा, किचनमधील ओला सुका कचरा, सुकलेली पाने आणि थोडी माती, कल्चर असा थर आच्छादला जातो. शेणखत, सेंद्रिय पदार्थांमुळे मातीच्या कणांची रचना दाणेदार बनून स्थिर तर होतेच. शिवाय जलधारणा शक्ती वानिचरा योग्य होतो. कमी किंवा जास्त प्रमाणात पाणी किंवा खत देणे हेसुद्धा झाडांच्या वाअनिष्ट परिणाम करते. म्हणूनच खतपाणी मोजून घातल्यास त्याचा वनस्पतींच्या वाव निरोगीपणावर चांगला परिणाम दिसून येतो. घरातून ठेवलेल्या कुंडय़ांतील झाडांवर बहुधा पांया रंगाची मऊ कीड पडते. बागेत चोरपावलाने शिरणाऱया किडी व रोग यांच्यापासून बागेचे संरक्षण करावयास हवे. वनस्पतींच्या संरक्षणासाठी जिवामृत हादेखील उत्तम पर्याय आहे. मुबलक पाणी, पुरेसा सूर्यप्रकाश, हवा आणि खताचा सुयोग्य वापर यामुळे दगडे यांची परसबाग सर्वांसाठी आकर्षण ठरत आहे.
परसबागेपासून मानसिक समाधान मिळते असं दगडे यांनी सांगितले. मुख्य म्हणजे कुणी येणार असेल तर परसबागेमुळे ऐन वेळेस धावाधाव करावी लागत नाही. आजकाल खाण्याच्या वस्तूंचा कस कमी झाला आहे. खताचा भरमसाट वापर, निकृष्ट, कस कमी झालेली जमीन नि दूषित सांडपाण्यावर लावलेला भाजीपाला खाणे टाळता येते. म्हणूनच मुलांना पूर्ण पोषक आणि चौरस आहार मिळावा यासाठी शक्यतो तुमच्याही परसदारी, गॅलरीत, गच्चीत, बिल्डिंगच्या आवारात ही बाग फुलवू शकाल! तेही अगदी स्वच्छता ठेवून. यात शहरीकरण, कमी जागा हा विषय गौण ठरतो. तुमच्या गालरीत स्टँडच्या आधारे तेलाचे डबे किंवा प्लास्टिकचे डबे यांच्या कुंडय़ा तुम्ही ठेवू शकता. घरच्या घरी सेंद्रिय भाजीपाला पिकविण्यासाठी शहरी शेती फुलविण्यासाठी गच्ची, गॅलरी किंवा अगदी खिडक्यांवरील ग्रिलचाही वापर करू शकतो. शहरातील घरात या सेंद्रिय भाज्या पिकवण्याचे महत्त्व सर्वांना जेव्हा पटेल त्या वेळी विषमुक्त अन्न घरीच उपलब्ध होईल. डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱयाचा भार कमी होईल.
‘इवलेसे रोप लावियेले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी’ ही ज्ञानेश्वरांची संतवाणी खऱया अर्थाने जगता येईल.























































