
>> वर्णिका काकडे
‘माडिया’ ही एक आदिवासी जमात असून त्यांचे वास्तव्य प्रामुख्याने महाराष्ट्रातील गडचिरोली जिह्यात आणि छत्तीसगडमधील बस्तर, नारायणपूर भागात आयेते. माडिया ही शतकानुशतके चालत आलेली आदिम भाषा आहे. ती बोलीभाषा आहे. तिला लिपी नाही. माडिया ही प्रामुख्याने गडचिरोली जिह्यातील आदिवासी जमातीची (माडिया गोंड) बोलीभाषा आहे, जी गोंडी भाषा समूहाचा भाग आणि द्रविड भाषा गटातली आहे. ही भाषा प्रामुख्याने मौखिक स्वरूपात असून, तिच्यावर स्थानिक मराठी व गोंडी भाषेचा प्रभाव दिसून येतो.
या भागात राहणाऱया लोकांच्या दैनंदिन व्यवहारात माडियासह मराठीचा मोठय़ा प्रमाणावर वापर होतो, त्यामुळे तिच्यावर मराठीची छाप पडली आहे. ही भाषा त्यांच्या ‘पेरसा पेन’ (दैवत) संस्कृतीशी जोडलेली आहे. माडिया ही महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी बोलीभाषांपैकी एक आहे. प्रामुख्याने मौखिक परंपरेने जोपासली गेली आहे, तरीही तिच्यात संवाद आणि काव्य आहे.
कोणताही लिखित दस्तऐवज नसताना या आदिवासी बोलीभाषा शतकानुशतके टिकल्या व आजही त्या त्या जमातीत, त्यांच्या खेडय़ातील दैनंदिन जीवनात वापरल्या जातात. काही अभ्यासकांच्या मते माडिया ही द्रविडी भाषा असून गोंडीच्या उपकुळातील आहे. मात्र यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे.
माडिया भाषेचा अभ्यास करताना लक्षात आले, की या भाषेत सुमारे 22 व्यंजने आणि 10 स्वर आहेत. ब्रयाच शब्दांत ‘ङ’ (‘वाङमय’) हा उच्चार आहे, उदा. ‘ओराङ’. काही शब्दात पायमोडय़ा ‘अ्’ सारखा उच्चार आ
बोलताना काही वेळा शब्दांचे उच्चार बदलतात, उदाहरणार्थ ‘नन्ना’ चे ‘नन’ (मी) होते, ‘अदू’ चे ‘अद’ (ती) होते. यावरून ही बोलीभाषा असली, तरी एक ‘प्रमाण’भाषा व एक रोजच्या व्यवहारात वापरली जाते ती भाषा असा भेद होत असावा असे वाटते. कोणत्याही भाषेच्या प्रवासात त्या भाषेवर नेहमीच इतर भाषांचा विविध कारणाने प्रभाव पडत असतोच. माडियांच्या वस्तीच्या आसपासच्या प्रादेशिक भाषांचा प्रभाव, उदा. मराठी, हिंदी, तेलुगू व इतर दाक्षिणात्य भाषांचा व त्याच जोडीला इंग्रजीचा प्रभाव या भाषेवर, विशेषत शब्दसंपत्तीवर पडलेला जाणवतो.
गडचिरोली व चंद्रपूर जिह्यातील अतिदुर्गम भागातील 94 टक्के माडिया आदिवासींना संविधानाची ओळख करून देण्यासाठी, पाथ संस्था व सामाजिक कार्यकर्त्यांच्या फाराने भारतीय संविधानाची ‘उद्देशिका’ आता स्थानिक आदिम माडिया बोलीभाषेत उपलब्ध झाली आहे.





















































