
अमेरिकेच्या न्याय विभागाने लैंगिक शोषण प्रकरणातील गुन्हेगार जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंधित नवी कागदपत्रे प्रसिद्ध केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप केल्याची धक्कादायक माहिती जगासमोर आली आहे. एपस्टीन याच्याशी असलेल्या संबंधांबाबत ट्रम्प यांचा यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या फाईल्समध्ये अनेकदा उल्लेख होता. मात्र, त्यांच्यावर अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोपांचा प्रथमच उलगडा झाला. एपस्टीन प्रकरणाचा तपास करताना एफबीआयने पीडित महिलांच्या घेतलेल्या मुलाखतीतून ही बाब समोर आली.





















































