
होळीच्या पाचव्या दिवशी पंचमीला साजरा होणारा सण म्हणजे रंगपंचमी.

रंगपंचमी म्हटले की बच्चेकंपनीची धमाल आली. एकमेकांना वेगवेगळे रंग लावत, पिचकारीने रंग उडवत खेळण्याची मजा काही औरच.

रंगपंचमीनिमित्त पुण्यातील मानाच्या मंडळांपैकी एक असलेल्या अखिल मंडई मंडळातर्फे लहान मुलांसाठी पाण्याचा मोठा हौद उभारण्यात आला होता.

या हौदामध्ये बच्चेकंपनीने रंगांची मनसोक्त उधळण करण्याचा आनंद लुटला.

लहान मुलांसह तरुण-तरुणींनीही एकमेकांवर पाणी उडवत, रंग लावत रंगपंचमी साजरी केली.

त्यामुळे तरुणाईचा उत्साह, जल्लोष, रंगाने माखलेले चेहरे, जोडीला तालासुरांची साथ, बेधुंद ठेका आणि मनसोक्त रंगांची उधळण असा रंगारंगी माहौल होता.

रंगलेले चेहरे, मुला-मुलींचे ग्रुप, पिचकाऱ्या घेऊन फिरणारी बच्चेकंपनी असे दृश्य दिसत आहे.





























































