जबाबाच्या आधारावर आरोपी करणे चुकीचे, हायकोर्टाकडून आरोपीला जामीन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हत्येच्या आरोपांतर्गत अटक करण्यात आलेल्या अर्जदाराची मुंबई उच्च न्यायालयाने सुटका केली आहे. सहआरोपीच्या जबानीच्या आधारावर गुन्हा सिद्ध होत नाही, इतकेच काय तर जबाबावर आधारित एखाद्याला आरोपी करणे हे कायद्यानुसार योग्य नाही असे स्पष्ट करत न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज मंजूर केला.

प्रशांत गोरे याच्या विरोधात बारामती सिटी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने जामिनासाठी अॅड. विवेक आरोटे, अॅड. अक्षय डिंगळे यांच्यामार्फत अर्ज केला. या याचिकेवर न्यायमूर्ती आर एम. जोशी यांच्यासमोर सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना खंडपीठाला सांगितले की, एफआयआरमध्ये याचिकाकर्त्याचे नाव प्रत्यक्ष हल्लेखोर म्हणून नमूद नाही. पोलिसांसमोर आरोपीने दिलेला जबाब पुरावा म्हणून ग्राह्य धरणे चुकीचे आहे. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीची पंधरा हजारांच्या जात मुचलक्यावर सुटका केली.