
आधारकार्ड, पॅनकार्डसारखेच रेशनकार्ड हे महत्त्वाचे आहे. रेशनकार्डचा वापर बऱ्याच ठिकाणी केला जातो. त्यामुळे रेशनकार्डला जपून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
रेशनकार्ड चोरीला गेले किंवा हरवले तर काय करावे, असा अनेकांना प्रश्न पडतो. सर्वात आधी अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
या वेबसाइटवर ‘डुप्लिकेट रेशनकार्डसाठी अर्ज’ असा पर्याय शोधून त्यावर क्लिक करा. ऑनलाइन फॉर्म डाऊनलोड करा किंवा थेट ऑनलाइन अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
अर्ज करताना आवश्यक आधारकार्ड, पॅनकार्ड आणि शपथपत्र जोडा. सर्व माहिती भरल्यानंतर अर्ज सबमिट करा. संदर्भ क्रमांक नोंदवून घ्या. ऑनलाइन पोर्टलद्वारे अर्जाची स्थिती तपासा.
ऑनलाइन शक्य नसेल तर तुमच्या जवळील संबंधित विभागीय कार्यालयात जाऊन डुप्लिकेट रेशनकार्डसाठी अर्ज भरा. अर्जासोबत शपथपत्र जोडून अर्ज कार्यालयात जमा करा.





























































