
रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील ९ शाळांना आदर्श शाळा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे यांच्या अध्यक्षतेखाली आदर्श शाळा पुरस्काराची बैठक संपन्न झाली. त्याबैठकीत आदर्श पुरस्कार विजेत्या शाळा निश्चित करण्यात आल्या.
आदर्श शाळा निवडीसाठी उपस्थितीचे शेकडा प्रमाण, सा. फु. द. पा. योजना, शैक्षणिक मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजना, शैक्षणिक उठाव, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र. 2, शाळेतील उपक्रम, नवभारत साक्षरता अभियान इत्यादी निकषांचा विचार करण्यात आला.
जिल्हा परिषद रत्नागिरी आदर्श शाळा पुरस्कार सन 2025-26 साठी कनिष्ठ प्राथमिक शाळा गटातून मंडणगड तालुक्यातून जि. प. प्राथमिक शाळा गांधी चौक, दापोली तालुक्यातून जि.प.प्राथमिक शाळा आंजर्ले नं. 1, खेड तालुक्यातून जि. प. प्राथमिक शाळा आंबडस सोलकरवाडी, चिपळूण तालुक्यातून जि. प. प्राथमिक शाळा आंबतखोल तांबडवाडी, गुहागर तालुक्यातून जि. प. प्राथमिक शाळा पाचेरीसडा नं.2 कवठीवाडी, संगमेश्वर तालुक्यातून जि. प. प्राथमिक शाळा तुरळ सुवरेवाडी, रत्नागिरी तालुक्यातून जि. प. प्राथमिक शाळा नाखरे भगवती नं. 2, लांजा तालुक्यातून जि.प.प्राथमिक शाळा वेसुर्ले तर राजापूर तालुक्यातून जि.प.प्राथमिक शाळा कोंडीवळे गोतावडेवाडी या शाळांची निवड करण्यात आली आहे. वरिष्ठ प्राथमिक शाळा गटातून मंडणगड तालुक्यातून जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा पालघर मराठी, दापोली तालुक्यातून जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा शिर्दे, खेड तालुक्यातून जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा चिंचघर दस्तुरी, चिपळूण तालुक्यातून जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा वालोटी नं.1, गुहागर तालुक्यातून जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा वरवेली नं. 1, संगमेश्वर तालुक्यातून जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा गोठणे पुनर्वसन हातीव, रत्नागिरी तालुक्यातून जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा भोके मायंगडेवाडी, लांजा तालुक्यातून जि.प.पूर्ण प्राथमिक शाळा इसवली सुतार तर राजापूर तालुक्यातून जि. प. पूर्ण प्राथमिक गोखले कन्या शाळा या शाळांची निवड करण्यात आली आहे.
आदर्श शाळा पुरस्कार समितीच्या सभेला प्राथमिक शिक्षणाधिकारी निलीमा नाईक, उपशिक्षणाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्राचार्य स.रा.देसाई अध्यापक विद्यालय विक्रांत रावराणे व राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक जि.प.प्राथ. आदर्श शाळा वाटद कवठेवाडी ता जि. रत्नागिरी माधव विश्वनाथ अंकलगे, उपस्थित होते.


























































