
इराणला धमक्या देणारे डोनाल्ड ट्रम्प हे प्रत्यक्षात सावध पावले टाकत असून त्यांनी सौदी अरेबियातून अमेरिकी राजदूतांना परत बोलावले आहे. दुसरीकडे, इराणशी चर्चा करण्यास तयार असल्याचे संकेत त्यांनी फॉक्स न्यूजशी बोलताना दिले आहेत. त्यामुळे अमेरिका काही दिवसांत युद्ध थांबवेल, अशी खात्री आंतरराष्ट्रीय बाजाराला वाटत आहे. या सगळ्याचा परिणाम आज हिंदुस्थानच्या शेअर बाजारातही दिसला. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गडगडणारा बाजार आज सावरला. मंगळवारी दिवसभरात सेन्सेक्समध्ये 640 तर निफ्टीमध्ये 233.55 अंकांची वाढ झाली. दरम्यान, युद्ध कधी संपेल हे अमेरिका नव्हे तर इराण ठरवेल, असे आयआरजीसीचे प्रवक्ते अली मोहम्मद नैनी यांनी ठणकावले. ट्रम्प आपला पराभव लपवण्यासाठी यशाचे खोटे दावे करत आहेत, असेही ते म्हणाले.






























































