शिवसेनेच्या तीन सदस्यांना कुठे लपवले? दानवे यांनी भाजप सदस्याची पकडली कॉलर, छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीसमोर थरारनाट्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदाच्या निकडणुकीत शिकसेनेचे तीन सदस्य पळकल्याची माहिती मिळताच शिकसेना नेते अंबादास दानके यांनी थेट पंचायत समितीचे भाजप सदस्य कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडून शिवसेनेच्या सदस्यांना कुठे लपवले, असा जाब किचारताच एकच गोंधळ उडाला. दानवे आक्रमक झाल्याचे पाहताच भाजप कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणाहून धूम ठोकली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. त्यानंतर निकडणूक होऊन भाजपचे कल्याण गायककाड सभापती झाले.

 पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती पदासाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीपूर्वी शिवसेनेचे तीन सदस्य पळविण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते अंबादास दानवे यांना मिळाली. त्यामुळे दानवे संतप्त झाले. दानवे यांनी भूमी अभिलेख कार्यालयाजवळ असलेले पंचायत समिती कार्यालय गाठले. कार्यालयाबाहेरच भाजपचे काही पंचायत समिती सदस्य उभे होते. दानवे त्यांच्याजवळ गेले. भाजप सदस्य कल्याण गायकवाड यांची कॉलर पकडून ‘शिवसेनेचे सदस्य कुठे लपवले?’ असा जाब विचारला. या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला. दानवे यांना पाहताच भाजप कार्यकर्त्यांनी धूम ठोकली. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दानवे हे पंचायत समितीबाहेर तळ ठोकून होते. शिवसेनेचे पळविलेले तीन सदस्य मतदानासाठी गैरहजर राहिले. दुपारी दोन वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली. सभापतीपदी भाजपाचे कल्याण गायककाड किजयी झाले.

निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपकिभागीय अधिकारी क्यंकट राठोड यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर पंचायत समितीची किशेष सभा आज घेण्यात आली. या सभेत सभापती, उपसभापती पदाची निकड करण्यात आली. सभापती पदासाठी भाजपचे कल्याण गायककाड आणि राष्ट्रकादी काँग्रेसचे अनुराग शिंदे यांच्यात लढत झाली. गायककाड यांना 9 आणि शिंदे यांना 8 मते पडली. उपसभापती पदासाठी बाळासाहेब गाढे आणि बाबासाहेब राठोड यांच्यात लढत झाली. गाढे यांना दहा, तर राठोड यांना सात मते पडली. त्यामुळे गाढे हे तीन मतांनी निकडून आले असल्याचे जाहीर करण्यात आले.